vasant more । raj thackeray : मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे.
शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय राहिले आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे वसंत मोरे यांनी मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र करत, पक्षातून काढता पाय घेतला. । vasant more । raj thackeray
दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. होय… स्वतः वसंत मोरेंनी याबद्दल खुलासा केला आहे. वसंत मोरे यांनी अनेक वर्षांचे मनसेशी असलेले नाते तोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली.
मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो.
काय होते हे घोडा मैदान जवळ असेल तेव्हा बघू. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
राज साहेबांचा फोन मला देऊ नका… । vasant more । raj thackeray
मनसे मधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे म्हणाले होते की, “पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका.
मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचेच नाही. मला आग्रह करुन साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल.” असे वसंत मोरे म्हणाले होते. । vasant more । raj thackeray