Tamil Nadu | Lok Sabha Election 2024 – तमिळनाडूत यंदा कमळ फुलवायचेच या जिद्दीने रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीला मतदानाला काही दिवसच राहीले असताना जोरदार झटका बसला आहे. त्याचे कारण म्हणजे पक्षाच्या एक नेत्या विद्या राणी यांनी भाजपला रामराम करत नाम तमिलर काची अर्थात एनटीके या पक्षात प्रवेश केला आहे.
एनटीकेने विद्या यांना कृष्णागिरी येथून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. विद्या या कुख्यात चंदन तस्कर विरप्पन याची कन्या आहेत. भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. आता त्यांनी तिकीट मिळण्यासाठीच पक्ष बदलत एनटीकेत प्रवेश केल्याचे सांगण्यात येते आहे. । Tamil Nadu | Lok Sabha Election 2024 । Vidhya Rani
दक्षिण भारतात व विशेषत: तमिळनाडूत भाजपचे नगण्य अस्तित्व आहे. त्यामुळे पक्षासाठी येथे प्रत्येक उमेदवार आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्यामुळे विद्या यांनी पक्ष सोडणे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला फटका देणारे आहे.
विद्या बऱ्याच काळापासून राजकारणात आहेत व राज्यातील भाजपच्या युवा शाखेच्या त्या उपाध्यक्षाही होत्या. पक्षाला तमिळनाडूत ओळख मिळवून देण्यात त्यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे. अर्थात आता एनटीकेच्या तिकीटावर त्यांचा विजय सोपा आहे असे नाही.
त्याचे कारण कृष्णागिरी मतदार संघातून तब्बल २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातले सगळ्यांत प्रमुख म्हणजे कॉंग्रेसचे तीन वेळा आमदार गोपीनाथ यांचे नाव. कृष्णागिरी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंत येथे झालेल्या प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच वरचढ ठरत आला आहे. | Lok Sabha Election 2024 । Vidhya Rani