दुबई – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (आरसीबी) नेतृत्व पुढील आयपीएलपासून सोडणार असे जाहीर केलेला विराट कोहली पुढील वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडला जाऊ शकतो, अशी भविष्यवाणी दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू गोलंदाज डेल स्टेन याने केली आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
कोहलीने यंदाच्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होण्यापूर्वीच आधी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आरसीबी संघाचेही यंदाच्या स्पर्धेनंतर नेतृत्व सोडण्याचेही सूतोवाच त्याने केले.
यावरूनच कोहलीची आता आरसीबी संघाकडून खेळत राहण्याची तयारी नसल्याचेच दिसत आहे, असेही स्टेनने सांगितले.