विकासाच्या मुद्द्यावरच प्रचारात भर – टिळक

पुणे – केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे यावरच आपल्या प्रचारात भर देत असून आपली प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात येत असल्याचे महायुतीच्या कसबा मतदारसंघाच्या उमेदवार मुक्‍ता टिळक यांनी स्पष्ट केले.

टिळक यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. शिवसेनेचे राजेंद्र शिंदे, आरपीआयचे मंदार जोशी, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस धीरज घाटे, नगरसेवक हेमंत रासने आणि कसबा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे, सरचिटणीस प्रमोद कोंढरे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर आणि शिवसेनेचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख विनायक धारणे उपस्थित होते.

टिळक म्हणाल्या, “कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात खासदार गिरीश बापट यांनी आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. ही कामे पुढे कार्यरत ठेवण्याची संधी पक्षाकडून आपल्याला मिळाली आहे, असा दावा टिळक यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.