पुणे -जिल्ह्यात 15 ते 18 वयातील मुला-मुलींच्या लसीकरणाला गती मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत सुमारे 47 टक्के युवागटाचे लसीकरण झाले आहे.
करोनाचा वाढता संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी देशभरात 15 ते 18 वयातील युवागटाच्या लसीकरणास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. या मोहिमेची जिल्ह्यातही तीन जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या वयातील पाच लाख 53 हजार 190 एवढे लाभार्थी आहेत.
या लाभार्थ्यांपैकी जिल्ह्यात एकूण दोन लाख 61 हजार 981 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 47 टक्के युवागटाचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
ग्रामीण भागात सर्वाधिक एक लाख 60 हजार 29 जणांचे लसीकरण करून या भागाने मुलांच्या लसीकरणात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बारामती, भोर, इंदापूर, वेल्हा
तालुक्याने लाभार्थ्यांपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. तर हवेली, मुळशी या शहराजवळ असलेल्या भागांमध्ये कमी प्रमाणात लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.