नवी दिल्ली – करोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे संक्रमण वाढत आहे. ते रोखण्यासाठी आता 13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागले आहे. भारतात 13 जानेवारीपासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला आपातकालीन वापरासाठी 3 जानेवारीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार 13 जानेवारीला लसीकरण अभियान सुरू करण्याचे संकेत आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचंही भूषण यांनी नमूद केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.