साताऱ्यात शनिवारपासून लसीकरण

सोळा ठिकाणी पंचवीस हजार जणांना लस देणार

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवार, दि. 16 पासून कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. प्रारंभी 14 हजार 357 आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी व ऍपवरील दहा हजार नोंदणीकृत नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या कोल्ड स्टेरेजमध्ये ही लस ठेवण्यात येणार आहे.

लस घेतल्यानंतरही सोशल डिटन्सचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधकारक आहे. नागरिकांना आणखी काही दिवस कोविडच्या नियमांचे पालण करावे लागणार आहे. सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालय व आर्यांग्ल रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा रुग्णालय, फलटण उपजिल्हा रुग्णालय, दहिवडी, खंडाळा, महाबळेश्वर, मेढा व पाटण ग्रामीण रुग्णालय, मायणी मिशन हॉस्पिटल, पुसेगाव, नागठाणे व तरडगाव प्राथमिक केंद्रे या ठिकाणी लसीकरण होणार आहे. प्रारंभी महसूल, पोलीस, शिपाई व सफाई कर्मचाऱ्यांनी कोविड ऍपवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रारंभी आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी कर्मचारी व अन्य, अशा एकूण 25 हजार जणांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.