”केंद्राला न जमल्यास आम्ही मोफत लस पुरवू”

नवी दिल्ली, दि.13 -केंद्र सरकारला न जमल्यास आप सरकार दिल्लीकरांसाठी करोनावरील लस मोफत उपलब्ध करेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी म्हटले.

जीव वाचवणारी लस विकत घेणे अनेकांना परवडणारे नाही. त्यामुळे देशभरात मोफत लसीकरण करण्याचे आवाहन मी याआधीच केंद्र सरकारला केले आहे. केंद्र सरकार काय करते ते पाहूया, असे केजरीवाल येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. लसीबाबत अफवा न पसरवण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. लसीच्या सुरक्षिततेची निश्‍चिती करूनच केंद्र सरकार आणि शास्त्रज्ञांनी लस आणल्याची खात्री वाटते. त्यामुळे कुठलीही साशंकता बाजूला ठेऊन जनतेने लसीकरणासाठी पुढे यावे, अशी भूमिकाही केजरीवाल यांनी मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.