पुणे – करोना प्रतिबंधक लस मोहिमेला मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्हीही लसीचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला सुट्टी देण्यात आली आहे.
गेल्या पंधरवड्यात कोविशील्डचे डोस बरेच दिवस बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी सात केंद्रांवर कोवॅक्सिनचे डोस देण्यात आले होते. त्यातून एका केंद्रावर तीनशे डोस ठेवण्यात आले होते. तसेच त्यानंतरही कोवॅक्सिनचे प्रत्येक केंद्रावर एक हजार डोस ठेवण्यात आले होते. कोविशील्ड लसीचे मात्र प्रत्येक केंद्रावर दोनशे डोसचे नियोजन करण्यात आले होते.
डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे टार्गेट राज्याच्या आरोग्य विभागानेच ठरवले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. जेवढ्या लसी उपलब्ध होत आहेत त्याचे लगेचच वितरण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच एकेका केंद्रावर कोविशील्डचे 200 तर कोवॅक्सिनच्या 1 हजार लसींचे आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.