लस घेतली, तरीही मास्क वापरणे आवश्‍यकच : खासदार डॉ. कोल्हे

हडपसर, मुंढव्यात लसीकरण केंद्रांची पाहणी

हडपसर – लस घेण्यास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्याचे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

खासदार डॉ. कोल्हे यांनी शनिवारी मगरपट्टा सिटी येथील लसीकरण केंद्राची पाहणी आणि सुविधांचा आढावा घेऊन डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी उपमहापौर नीलेश मगर, प्रभारी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, नंदुकाका मगर उपस्थित होते.

तसेच हडपसर गाडीतळ येथील बंटर शाळेतील लसीकरण केंद्रालाही खासदारांनी भेट देऊन डॉक्‍टरांशी संवाद साधला.

माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे, माजी नगरसेवक सुनील बनकर, कॉंग्रेसचे पदाधिकारी प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे यावेळी उपस्थित होते. या केंद्रात अधिक सुविधा मिळाव्यात तसेच स्वतंत्र कोविड सेंटर उभारून रुग्णांना सुविधा पुरवाव्यात या गोष्टी पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. यांसह मुंढवा येथील कोद्रे हॉस्पिटल लसीकरण केंद्रालाही भेट देऊन डॉ. कोल्हे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेविका पूजा कोद्रे, समीर कोद्रे, माजी उपमहापौर निलेश मगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते.

नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या कामाचे कौतुक
भाजपचे नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या प्रयत्नांतून उभारलेल्या पालिकेच्या रुग्णालयाची पाहणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन डॉक्‍टर व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे उपस्थित होते. नगरसेवक आबा तुपे यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक यावेळी खासदारांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.