‘गंगूबाई काठियावाडी’ ओटीटीवर प्रदर्शित करणार ?

चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करायला आलिया होणार तयार

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. संजय लीला भन्साळी यांनासुद्धा आपल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासोठी आता मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कोरोनामुळे संजय लीला भन्साळी मोठा निर्णय घेत ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करू शकतात अशी चर्चा आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र महाराष्ट्रात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे त्यामुळे त्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागणार असल्याचीही चर्चा आहे.

संजय लीला भन्साळी यांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचा होता, मात्र परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांना ओटीटीचा सहारा घ्यावा लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अनेक निर्मात्यांनी चित्रपट रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे, त्यात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचाही समावेश आहे. आता भन्साळी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणार की परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होईल, हे संजय लीला भंन्साळी स्वतःच सांगू शकतील.

गंगूबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात ती गंगूबाईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. काही आठवड्यांपूर्वी आलियाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती ज्यामुळे तिला चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागलं. आता बरी झाल्यानंतर ती लवकरच चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणार आहे. पण ती तिचा हा चित्रपट ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार असेल का? कारण या चित्रपटाच्या थिएटर रिलीजबद्दल ती उत्साही होती.

हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.