#CWC2019 : भारताच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू लक्ष्मण म्हणाला…

लंडन – भारतीय संघाने विश्‍वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत भरात असलेल्या भारतीय संघाला एका खराब खेळीची किंमत स्पर्धेतून बाहेर होत चुकवावी लागली. याच पार्श्‍वभूमीवर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने आपल मत व्यक्त केलं आहे.

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण म्हणाला की, ‘भारताच्या पहिल्या फळीने निराशा केली, तेथेच न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळविली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली,पण जडेजा व धोनी यांची झुंज अतुलनीय होती.

Leave A Reply

Your email address will not be published.