चारा घोटाळा प्रकरण: लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर, पण…

रांची – चारा घोटाळा प्रकरणात कारावासाची शिक्षा भोगणारे आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजुर केला. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी आपला पारपोर्ट न्यायालयात जमा करावा, असे आदेशही त्यांना कोर्टाने दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.