मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे याच विषयावरून विनंती केली आहे.
एमपीएससी परीक्षा त्वरित घेण्यात याव्यात तसेच प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशा प्रकारची विनंती रोहित पवार यांनी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे.
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2021
करोनामुळे स्थगित केलेली एमपीएससीची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करुन सरकारकडे केली आहे.