Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. संपूर्ण देश हे कामगार सुखरूप बाहेर येण्याची वाट पाहत होता. कामगार बाहेर आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. परिवारातील सदस्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
#WATCH | Uttarkashi tunnel rescue | A worker involved in the rescue operation says, “Four workers have been rescued so far. Everyone is very happy…” pic.twitter.com/CsGDbytsAg
— ANI (@ANI) November 28, 2023
देशातील आठ राज्यांत राहणाऱ्या या 41 कामगारांसाठी उत्सवाचे वातावरण आहे. एका मजुराच्या नातेवाईकाने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, तो गेल्या दोन आठवड्यांपासून या दिवसाची वाट पाहत होता. आज त्याच्या आनंदाला सीमा नाही. झारखंडमध्ये सर्वाधिक उत्सवाचे वातावरण आहे, कारण झारखंडमधील 15 लोक बोगद्यात अडकले होते. यासोबतच यूपीमधील 8, उत्तराखंडमधील 2, हिमाचल प्रदेशातील 1, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 3, आसाममधील 2 आणि ओडिशातील 5 मजूर अडकून पडले होते.
मिठाईचे वाटप केले जात आहे –
दिवाळीदरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलनामुळे 41 मजूर अडकले होते. या अपघातानंतर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. जसजसे दिवस जात होते तसतसे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये निराशा आणि नाराजी वाढत होती. मात्र आता या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर कुटुंबीयांचे चेहरे आनंदाने उजळले आहेत. झारखंडचे रहिवासी अनिल बेदिया यांच्या कुटुंबीयांनी ते बाहेर पडल्यावर मिठाई वाटली.
Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue: CM Pushkar Singh Dhami meets the workers who have been rescued from inside the Silkyara tunnel pic.twitter.com/f4JsRKsqmJ
— ANI (@ANI) November 28, 2023
नातेवाईक आनंद साजरा करत आहेत –
एएनआयशी बोलताना दुसऱ्या मजुराच्या नातेवाईकाने सांगितले की, ज्यांच्यासाठी आम्ही 16 दिवसांपासून वाट पाहत होतो ते सुखरूप बाहेर आले आहेत, यापेक्षा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट काय असू शकते.