Uttarkashi Tunnel Rescue : 17 दिवसांच्या अथक बचाव मोहिमेनंतर, उत्तराखंडच्या उत्तरकाशी (Uttarkashi Tunnel Rescue) जिल्ह्यातील अर्धवट कोसळलेल्या सिल्कियारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue) अडकलेल्या सर्व 41 कामगारांची मंगळवारी सुटका करण्यात आली. पहिला कामगार संध्याकाळी 7.56 वाजता अडकलेल्या भागातून बाहेर आला, त्यानंतर लगेचच इतरांनाही बाहेर काढले.
2-किलोमीटर लांब, 8.5-मीटर-उंच बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचणे, ऑगर मशीनद्वारे प्रगत क्षैतिज ड्रिलिंग तंत्र वापरून प्रयत्न करूनही आव्हानात्मक ठरले. तथापि, जेव्हा तांत्रिक समस्या उद्भवल्या, तेव्हा अंतिम 10 मीटर खोदकामासाठी अधिकारी मॅन्युअल ड्रिलिंगकडे वळाले आणि अशक्य वाटणारे हे काम पूर्ण करत 41 कामगारांना नवे आयुष्य दिले.
सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांचे याबद्दलच्या प्रत्येक बारीक अपडेटवर लक्ष दिसले. आता या घटनेवर आधारित थेट चित्रपट तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
फक्त चित्रपट नाही तर या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता ‘अक्षय कुमार’ (akshay kumar) हा मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जातंय. त्याबद्दलचे एक पोस्टर देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. अशाप्रकारच्या स्टोरीच्या चित्रपटामध्ये काम करण्यास अक्षय कुमार याला आवडते हे सर्वांनाच माहिती आहे. आता याबद्दल मोठा खुलासा काही दिवसांमध्ये होऊ शकतो असे देखील सांगण्यात येत आहे.
उत्तरकाशीमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये मजूरांना बाहेर काढण्यासाठी महत्वाची भूमिका ही ‘अर्नोल्ड डिक्स’ नावाच्या व्यक्तीने पार पडली. आता चित्रपटात अक्षय कुमार हा अर्नोल्ड डिक्स याच्याच भूमिकेत दिसणार का? अन्य कोणते महत्वाचे पात्र साकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सिनेमाचे पोस्टर समोर आल्यावर याबद्दलचे अनेक खुलासे होणार हे नक्की. सोशल मीडियावर देखील याबद्दल अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.