नवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. भाजपने रविवारी निवडणुकीसाठी थीम सॉन्ग लाँच केले आहे. या थीम साँगमध्ये देवभूमीच्या प्रत्येक परिसराची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये ढगांना छेदनारे मोठे पर्वत आणि गंगेचा निर्मळ आणि अखंड प्रवाह उत्तराखंडचे सौंदर्य सांगत आहेत. त्याचबरोबर देवभूमीचा अध्यात्मिक इतिहास ऋषीमुनींच्या दृश्यांसह दाखवण्यात आला आहे.
जहां पवन बहे संकल्प लिए, जहां पर्वत गर्व सिखाते हैं,
जहां ऊंचे-नीचे सब रस्ते, बस भक्ति के सुर में गाते हैं।
उस देवभूमि के ध्यान से ही, मैं सदा धन्य हो जाता हूं।
मैं तुमको शीश नवाता हूं, और धन्य-धन्य हो जाता हूं। pic.twitter.com/ZIsaE3hDKE— BJP Uttarakhand (@BJP4UK) January 30, 2022
भाजपचे राज्यसभा खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपचे थीम सॉन्ग ट्विट केले आहे. ‘आज उत्तराखंडसाठी @BJP4India कडून एक थीम सॉन्ग रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवभूमी आणि वीरभूमी उत्तराखंडप्रती असलेली भक्ती दर्शवते. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पुढील दशक उत्तराखंडचे.’, असे बलूनी यांनी म्हंटले आहे. दरम्यान, मीडिया ओपिनियन पोलनुसार, उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.