उत्तरप्रदेशातील सिलिंडर स्फोटात दहा जण ठार

मऊ – उत्तरप्रदेशात मऊ गावातील वालिदपुर भागात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात दहा जण ठार झाल्याची घटना आज घडली. घरात स्वयंपाक सुरू असताना हा सिलिंडर स्फोट झाला.

या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी घेतली असून त्यांनी संबंधीत जिल्ह्यातील पोलिस व महसुल आधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन जखमींना आणि अन्य आपदग्रस्तांच्या कुटुंबियांना आवश्‍यक ती मदत करण्याची सुचना केली आहे.

या स्फोटात अन्य पंधरा जण जखमी झाले आहेत असे जिल्हाधिकारी ग्यानप्रकाश त्रिपाठी यांनी सांगितले. या दोन मजली इमारतीत अनेक बिऱ्हाडे राहात होती. स्फोटाची तीव्रता खूपच मोठी असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.