ब्लेझिंग बॅशर्सच्या विजयात रिगन, तेजलची चमक

मुंबई – रिगन अलबुक्‍युरेक्‍यू आणि तेजल कांबळे यांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर युटीटी मुंबई सुपर लीग स्पर्धेत गतविजेत्या ब्लेझिंग बॅशर्स संघाने फॅंटम स्टार्स संघाविरुद्ध चमक दाखवत विजय मिळवला.एनएससीआय येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रिगन व तेजल यांनी यांनी चार सामन्यात विजय मिळवत संघाच्या 16-11 विजयात चमक दाखवली.

गुरचरन गिलने संघासाठी चांगली सुरुवात केली. त्याने नवीन सालियनला 3-0 (11-6, 11-9, 11-7) असा विजय मिळवला. रिगनने यानंतर रविंद्र कोटीयनला 2-1 (11-1, 8-11, 11-10) असे पराभूत केले.पण, श्रुती अमृतेला ममता प्रभूकडून 0-3 (7-11, 7-11, 4-11) असे पराभूत व्हावे लागले. मिश्र दुहेरीत तेजल आणि आदील आनंद यांनी ऋषीकेश मल्होत्रा आणि अनन्या चांदेला 2-1 (6-11, 11-10, 11-10) असे पराभूत केले.

दरम्यान, कॅडेट मुलांच्या गटात मर्व्हन पटेलला तवंथ नेरजलेने 1-2 (11-10, 5-11, 7-11) असे नमविले. यानंतर रिगनने श्रुती अमृतेसोबत रविंद्र कोटीयन आणि ममता प्रभूला 2-1 (10-11, 11-9, 11-9) असे पराभूत केले. मुलींच्या ज्युनिअर गटात तेजलने अनन्या चांदेला 2-1(11-10, 11-10, 8-11) असे पराभूत केले.

गुरचरण सिंग गिल आणि मर्व्हन पटेल यांनी नवीन सालियन व तवंथ नेरजले यांना नमविले तर, आदील आनंदने ऋषीकेश मल्होत्रावर विजय मिळवला. यासोबतच गेल्या हंगामातील उपविजेते एस संघाने कुल स्मॅशर्स संघावर 14-13 असा विजय मिळवला. तर, सेंच्युरी वॉरीयर्स संघाने वेस्ट कोस्ट रेंजर्स संघाला 14-13 असे पराभूत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.