आंध्रच्या आशा सेविकांचे मानधन तिपट; जगनमोहन रेड्डींची घोषणा

 ज्येष्ठ नागरिकांना तीन हजारांचे निवृत्तीवेतन

अमरावती: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच जगनमोहन रेड्डी यांनी आरोग्य विभागात कार्यरत आशा कार्यकर्त्यांना खुशखबर दिली आहे. आशा सेविकांचे मानधन तिपटीहून अधिक केले आहे. आशा सेविकांचे मानधन तीन हजार रुपयांवरुन थेट दहा रुपयांवर नेण्यात आल्यामुळे त्यांना सरसकट सात हजारांचा लाभ होणार आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सत्तेत आल्यास आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आपल्या शब्दाला जागत रेड्डींनी आशा सेविकांचे मानधन दहा हजार केले आहे. तर आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजारांचे निवृत्तीवेतन देण्याची घोषणाही त्यांनी केली.
गेल्या वर्षी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजारांवरुन 4 हजार 500 रुपये करण्यात आले होते, तर अंगणवाडी सहाय्यकांचे मानधन दीड हजारांवरुन 2200 रुपये करण्यात आले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत वायएसआर कॉंग्रेसला एकहाती विजय मिळवून देणारे पक्षाचे शिल्पकार वायएस जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल ईएसएल नरसिंहा यांनी जगनमोहन रेड्डींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर कॉंग्रेसने 175 पैकी 151 जागा मिळवत तेलुगू देसम पक्षाला धूळ चारली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.