कोरोना बरा होण्यासाठी आवश्यक औषधे देताना रेमडेसिविरचा वापर शक्यतो टाळावा – पालकमंत्री छगन भुजबळ

नामको हॉस्पिटल संचलित आर.एम. डी.कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

नाशिक : नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची सुरवात करण्यात आली, हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी परंतु रेमडेसिविरचा वापर आवश्यक असेल तरच करावा शक्यतो त्याचा वापर टाळण्यात यावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज नामको हॉस्पिटल संचलित आर.एम. डी. कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्णसंख्या वाढली असल्याने औषधे व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र तरी देखील आवश्यक त्या सोयी सुविधा शासन, प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेडची संख्या कमी असताना आपण ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहेत. वैदयकीय क्षेत्रात ज्याला आवश्यक आहे त्याला प्राधान्याने मदत करून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात ठेऊन कोविड केअर सेंटरचे काम सुरू ठेवावे. आपल्या पूर्वजांनी मोठं कष्टाने सामाजिक कार्य सुरू केलं आहे ते अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. लॉकडाऊनचा परिणाम अतिशय चांगला होत असून रुग्ण संख्या कमी होण्यास त्याचा अतिशय फायदा होत आहे. पुढची लाट येण्याच्या अगोदर आपण तयारी ठेवावी लागेल. कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने याचा भविष्यात देखील उपयोगी ठरणार आहे असेही पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.