न्युयॉर्क :- अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित नोवाक जोकोवीचने अपलातून खेळ करताना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याने चौथ्या फेरीच्या लढतीत क्रोएशियाचा बोर्ना गोजोवर 6-2, 7-5, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली.
या स्पर्धेत जोकोवीचलाच संभाव्य विजेता मानले जात आहे. त्याला गेल्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते यंदा मात्र, तो पूर्ण भरात असून आतापर्यंतची त्याची वाटचालही स्वप्नवत राहीली आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचचा सामना अव्वल मानांकित अमेरिकन टेलर फ्रिट्झशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10 वाजूून 45 मिनिटांनी सुरू होईल.
अन्य लढतीत रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने अर्जेन्टिनाच्या सॅबेस्टीन बेझचा 6-2, 6-2, 7-6 असा पराभव केला. जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हने बल्गेरीयाच्या ग्रीगोर दीमीत्रोव्हवर 6-7, 7-6, 6-1, 6-1 अशी मात केली.
बोपण्णा-एब्डेन उपांत्यपूर्व फेरीत..
पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियाचा सहकारी खेळाडू मॅथ्यु एब्डेनसह खेळताना उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. बोपण्णा-एब्डेन जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ब्रीटनच्या ज्युलियन कॅश व हेन्री पॅटेन या जोडीवर 6-4, 6-7, 7-6 अशी मात केली.