अमेरिकेची पहिली मदत सामग्री भारतात दाखल; दिली ‘ही’ मदत

नवी दिल्ली, दि. 30 – भारतातील करोना आपत्तीच्या संबंधात अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आलेली मदत घेऊन येणारे पहिले विमान भारतात दाखल झाले आहे. त्यात ऑक्‍सिजन सिलिंडर्स, रेग्युलेटर्स आणि अन्य वैद्यकीय सामग्रीचा समावेश आहे. अमेरिकन हवाईदलाच्या सी-5एम या सर्वात मोठ्या मालवाहू विमानाद्वारे ही सामग्री आणण्यात आली आहे.

दुसरे विमानही आजच भारतात पोहोचणार आहे. या मदतीचे स्वागत करताना भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्‍तेअरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील ही आरोग्य भागीदारी करोनाच्या जागतिक आपत्तीचा मुकाबला सक्षमपणे करू शकणार आहे. अमेरिकेने या संकट काळात भारताला जी वैद्यकीय मदत सामग्री पोहोचवली आहे, त्याबद्दल त्यांनी अमेरिकेचे आभारही मानले आहेत.

आत्तापर्यंत भारताला रशिया, फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेलजीयम, रोमानिया, लक्‍झेंमबर्ग, सिंगापूर, पोर्तुगाल, स्वीडन, न्यूझीलंड, कुवेत आणि मॉरिशस या देशांनी मदत पाठवली आहे. काल गुरुवारी रशियाने भारताला 20 टन मदत सामग्री पाठवली. त्यात प्रामुख्याने ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.