न्यूयॉर्क : मागील अनेक महिन्यांपासून अमेरिकेच्या आकाशात चीनचे एका स्पाय बलून आढळून येत होते. याच चीनच्या स्पाय बलूनवर आता अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. चीनचा स्पाय बलून अमेरिकेकडून पाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेने F-22 फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा करत चीनचा स्पाय बलून फोडला आहे. यासोबतच अमेरिकेने चीनच्या हेरगिरीचा डाव उधळून लावला आहे.
अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या स्पाय बलूनबाबत चीनने, याचा वापर हवामानसंबंधित माहिती गोळा करण्यासाठी करण्यात येईल, असे म्हटले होते. दरम्यान, अमेरिकेने चीनच्या स्पाय बलून पाडत चीनला मोठा झटका दिला आहे. जो बायडन प्रशासनाने कॅरोलिना किनार्याजवळ एक चीनचा स्पाय बलून पाडला आहे. F-22 लढाऊ विमानातून डागलेल्या क्षेपणास्त्राने हा फुगा फोडण्यात आला. अमेरिकेने एफ-22 फायटर जेट F-22 मधून स्पाय बलूनवर क्षेपणास्त्राचा मारा केला. पेंटागॉनने दावा केला होता की, या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत आहे. पेंटागॉन अमेरिकेच्या सैन्य दलाचे मुख्यालय आहे.
मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये आकाशात चीनचा स्पाय बलून उडताना दिसला. चिनी स्पाय बलून पहिल्यांदा अमेरिकेतील अणुऊर्जा प्रकल्पाच्या वर उडताना दिसला होता. यानंतर हा बलून लॅटिन अमेरिकेत दिसला. या बलूनवर अमेरिकेची करडी नजर होती. या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत असल्याचा दावा पेंटागॉनने केला होता.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने चिनी स्पाय बलून खाली पाडण्यात आल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हा स्पाय बलून फोडला आहे. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी दिलेल्या निवेदनानुसार, लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राचा मारा करत दक्षिण कॅरोलिनाच्या किनार्याजवळ चीनचा स्पाय बलून खाली पाडला. याचे अवशेष हटवण्याचे काम सुरू आहे.