मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:साठी स्थान निर्माण केले नसेल, परंतु अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत राहते. ऋषभ पंतसोबत तिचे नाव यापूर्वी अनेकदा जोडले गेले आहे. मात्र याकडे दोघांनी नेहमीच दुर्लक्ष केले.
आता उर्वशी आणखी एक बातमी समोर येत आहे. उर्वशी नव्या बंगल्यात शिफ्ट झाल्याचं बोललं जात आहे. उर्वशी गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबईत स्वत:साठी घर शोधत होती आणि उर्वशी आता जुहू येथील यश चोप्रा यांच्या बंगल्याजवळील बंगल्यात शिफ्ट झाली आहे. हा तोच बंगला आहे ज्यात यश चोप्राची पत्नी पामेला चोप्रा मृत्यूपर्यंत राहत होत्या.
रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी उर्वशीने लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ‘सेलेस्ट’मध्ये राहण्यासाठी बंगला तयार केला होता. पण ती तिकडे शिफ्ट झाली नाही. त्याऐवजी उर्वशीने राहण्यासाठी जुहूचा बंगला निवडला. यात ती नुकतीच शिफ्ट झाली असून तिने अतिशय सुंदर सजावट केल्याचे वृत्त आहे. उर्वशी नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पॉट झाली होती.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशीने तिच्या मगरीचा हार घालून चर्चेत आली. या नेकपीसची किंमत जवळपास २७६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी त्याची किंमत 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. उर्वशीच्या या लोकप्रिय नेकलेसला दोन मगरी जोडल्या आहेत.