मुंबई – सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच आता उर्फीने महिला आयोगात धाव घेतली आहे.
उर्फीने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महिला आयोगाकडे धाव घेतली आणि त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. शिवाय उर्फीने वकिलांचा देखील सल्ला घेतला आहे. तिच्या वकिलांनीच तिला रुपाली चाकणकरांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, उर्फी आधी चित्रा वाघ यांनी देखील उर्फीविरोधात तक्रार करण्यासाठी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. परंतु त्यावेळी त्यांना महिला आयोगाने उर्फीवर कारवाई करता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर चित्रा वाघ महिला आयोगावर देखील संतापल्या होत्या.