Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीत सिनेसृष्टीत मोठे यश संपादन केले आहे. तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक कारणामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. याशिवाय तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. आता पुन्हा एकदा अनन्या तिच्या विचित्र ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. इतकेच काय तर नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे.
अनन्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत तिने वेगळ्या पद्धतीचा ड्रेस परिधान केल्याचे दिसते. पहिल्या फोटोत तिने फुलपाखरूच्या आकाराचा टॉप परिधान केला आहे. तर त्यासोबत वेलवेट स्कर्ट परिधान केला आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने रंगीबेरंगी ड्रेस परिधान केल्याचे दिसते. हे फोटो शेअर करत अनन्याने कॅप्शन दिलं की ‘पॅरिस कॉइचर वीकमध्ये राहुल मिश्रासाठी वॉक करत असताना मला या सुपरहीरोंची नक्की काय विचार असतात त्याची कल्पना आली आणि ती आवडली.’
View this post on Instagram
यावर अनन्या उर्फीला भेटून आली वाटते,’ अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तर काहींनी ‘उर्फीने केलं की ट्रोल करतात आणि अनन्याने केले की तिची स्तुती करतात,’ असे म्हणत तिची स्तुती देखील केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनन्याने सहभाग घेतला होता. अनन्याने ब्लॅक बटरफ्लायसारखा मिनी ड्रेस घातला होता. यावेळी तिने हातात गोल आकाराचे मोठे जाळे धरले होते. तिच्या या फॅशननंतर अनेकांनी तिला ट्रोल केले होते.
अनन्या पांडेच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाले तर, गेल्या वर्षी आयुषमान खुराणासोबत ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसून आली होती. त्यानंतर ती ‘खो गये हम कहा’ मध्ये दिसून आली होती. नेटफ्लिक्सवर आलेल्या या चित्रपटाने चाहत्यांची पसंती मिळवली होती. लवकरच ती विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘कंट्रोल’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘कॉल माई बे’ आणि ‘शंकरा’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.