मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात नूतन अभ्यासिकेचा अधिक फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून भविष्यात अनेक विकासकमे शैक्षणिक क्षेत्रात, तालुक्यात होतील. त्याची ही पायाभरणी आहे. असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष निधीतून बांधण्यात येणाऱ्या नूतन अभ्यासिकेचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंचर नगर पंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, राजेंद्र चव्हाण, उदय पाटील,
राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, दत्ताशेठ थोरात,सुहास बाणखेले, संतोष माशेरे, राजेन्द्र थोरात, सचिन बाणखेले उपस्थित होते. प्रा. राजाराम बाणखेले, उदय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गणेश वाघ व डॉ. सचिन रूपनवर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ बाळासाहेब गार्डी यांनी आभार मानले.