UPI started in France : देश बदल रहा है म्हणत केंद्रातील मोदी सरकारने डिजिटल पेमेंट करण्यावर भर दिला आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून देशातील कोट्यवधी जनता ऑनलाईन पेमेंटचा वापर करताना दिसून येते. दरम्यान आता देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील UPI चा वापर करण्यात येणार आहे. आता फ्रान्समध्येही वापरता येणार आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे UPI लाँच करण्यात आले. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने यासंबंधीची माहिती दिली आहे.
फ्रान्समधील भारतीय दूतावासाने माहिती देताना, यूपीआयला जागतिक स्तरावर नेणे हा पंतप्रधान मोदींच्या व्हिजनचा भाग असल्याचे म्हटले आहे. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) औपचारिकपणे लाँच केले. आता लोक यूपीआयद्वारे आयफेल टॉवरचे तिकीट काढू शकतील.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीनंतर हे लॉन्च करण्यात आले आहे. मॅक्रॉन 25 जानेवारीला जयपूरला पोहोचले होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना UPI पेमेंट डिजिटल प्रणालीबद्दल माहिती दिली होती. पेमेंट कसे करायचे ते शिकवले. याशिवाय दोन्ही नेत्यांनी चहा प्यायला. त्याचे पेमेंट अध्यक्ष मॅक्रॉन यांनी केले.