Parineeti Chopra : परिणीती चोप्रा उत्तम अभिनेत्रीसह एक गायिका देखील आहे. अल्पावधीतच परिणीतीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेकदा तिने सोशल मीडियावर तिचे गाण्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. जे चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडले आहे. अभिनयासह संगीत क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या परिणीतीचा नुकताच एक लाइव्ह परफॉर्मन्स मुंबईत पार पडला. मात्र आता यावरून तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये परिणीती ‘मै परेशान’ हे गाणं सादर करताना दिसत आहे, परंतु यावेळी बेसुर गायल्याचे काहींच्या निदर्शनास आले. यावरुन नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लोकांनी कमेंट करत परिणीतीला गाणं थांबवण्याची विनंती केली आहे. एका नेटकऱ्याने “मला तर त्या शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांबद्दल फार वाईट वाटत आहे,” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी तिची तुलना राणू मंडलसोबत केली आहे.
View this post on Instagram
परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘सायना’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. लवकरच परिणीतीचा ‘चमकीला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंजाबचे प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असून तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दलजित दोसांझबरोबर परिणीती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन इम्तियाज अली याने केलं असून ए.आर. रहमान यांनी याला संगीत दिलं आहे.