वाराणसी – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी नेत्यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित झाले आहे. निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 7 मार्च रोजी होणार आहे. वाराणसी आणि शेजारच्या 8 जिल्ह्यांमधील विधानसभा मतदार संघांमध्ये हे मतदान होणार आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi visited Varanasi Cantt Railway Station last night. He also interacted with shopkeepers. pic.twitter.com/ydx9VBYQ3Q
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 5, 2022
यातच संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीदोन दिवसीय दौरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रोड शो केला. यांनतर शुक्रवारी मध्यरात्री अचानक मोदी वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांनी स्टेशनची पाहणी केली. सध्या त्यांचा रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
UP | Prime Minister Narendra Modi inspects Varanasi Cantt Railway Station, post his roadshow ahead of the last phase of #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/RyP0qNZvYL
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022
स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चालत त्यांनी प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेचा आढावा घेतला.येथून पंतप्रधानांचा ताफा खिडकीया घाटावर पोहोचला. पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.