वस्तू आणि सेवा कराची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी वस्तू आणि सेवा कराची माहिती दिली. सगळय़ा करांच जागा फक्त एकच कर घेणार तो म्हणजे ‘जीएसटी’. याच वस्तू आणि सेवा कराची (GST) सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. अर्थसंकल्पी भाषणादरम्यान त्यांनी वस्तू आणि सेवा कराची माहिती दिली.

दरम्यान, वस्तू आणि सेवा कराची माहिती देतांना निर्मला सीतारामन म्हणाल्या,’जीएसटी’ने मागील दोन वर्ष आव्हानांचाही सामना केला, मात्र  बदल करण्यासाठी जीएसटी परिषदेने काम केलं. आतापर्यंत आपल्याला नवीन १६ लाख करदाते मिळाले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. २०१७ मध्ये देशात जीएसटी लागू झाला होता. त्यातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न जीएसटी कौन्सिलकडून केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. जीएसटीमधील कपातीचा ग्राहकांना फायदा झाला. ग्राहकांचे जवळपास १ लाख कोटी वाचले असा दावा सीतारामन यांनी केला. एप्रिलपासून जीएसटीची नवी सुधारित आवृत्ती लागू होईल. ही प्रणाली सुधारित आणि सुटसुटीत असेल असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.