पुणे : सामाजिक परिस्थिती सध्या नैराश्य घेवून आली असल्याने सध्या कोरोना मुळे संपुर्ण भारत बंद आहे. अशातच प्रत्येक जण समाजप्रबोधन करताना दिसत आह. यात सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात होताना दिसत आहे.
असाच ओतूर येथिल युवकांनी समाजप्रबोधनपर सामाजीक एकतेचा व्हिडीओ बनवला असून तो सध्या सोसल मिडीयावर गाजत आहे.ओतूरचा रिद्धी शहा,अनेरीं वोरा ,आदिती वोरा, दर्शना शहा, धनंजय रावत,गणेश रावत,पार्श्व शहा, अक्षय शहा यांनी आपल्या संकल्पनेतून हा व्हिडिओ तयार केला आहे.