कामशेत – बर्ड फ्ल्यू रोगामुळे होणारे नुकसान कमी करण्याबरोबरच उपाययोजना करण्यासाठी सोयीचे ठरावे, याकरिता राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या कुक्कुटपालन प्रक्षेत्रांची दरमहा अद्ययावत माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच ती दरवर्षी अद्ययावतदेखील केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता 20 मुदद्यांचा समावेश असलेली माहिती कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पशूसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादूर्भाव झाला होता. हा संसर्गजन्य रोग असुन, त्याचा मानवालादेखील प्रादूर्भाव होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्यावर्षी या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडा जाहिर केला आहे. त्यानुसार प्रादुर्भाव झालेल्या एक किलोमीटर परिसरातील कुक्कुट व इतर पाळीव पक्षी, पक्षीखाद्य, पक्षीखाद्यासाठी लागणारा कच्चामाल, अंडी या वस्तू जाणीवपूर्वक नष्ट कराव्या लागतात. त्यामुळे कुक्कुटपालक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते. तर या वस्तू नष्ट केल्याने या व्यावसिाकांना नुकसान भरपाई देण्याकरिता केंदे व राज्य सरकारला निधी खर्च करावा लागतो.
या पार्श्वभुमीवर अशाप्रकारचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरिता पशू संवर्धन आयुक्तालयाने उपाययोजना आखल्या आहेत. या उपाययोजनांतर्गत या व्यावसायिकांना विविध सुचना देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत कुक्कुटपालनाच्याठिकाणी मुलभुत स्वच्छता राखावी. जैवसुरक्षा कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. तशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावावा. व्यवसायाच्याठिकाणाची स्वच्छता, पक्षी, अंडी, पक्षीखाद्य वाहतूक, मलमूत्र व्यवस्थापन मृत पक्षांची विल्हेवाट, उपचार, रोगप्रतिबंधक लसीकरणाची खबरदारी घ्यावी.
कुक्कुटपालनाच्याठिकाणी असलेल्या पक्षांची मर, स्थलांतरित पक्षी, कावळ्यांमध्ये अधिक प्रमाणात होत असल्यास त्याही बाब तत्काळ नजीकच्या पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशाठिकाणी तत्काळ पथक पाठविण्यात येणार असुन, अशा मृत पक्षयांची तपासणी करुन संशय येत असल्यास अशा पक्षांचे नमुने पुण्यातील रोग अन्वेषण प्रयोगशाळेमार्फत भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणि रोग संस्थेकडे निदानसाठी पाठविले जाणार आहेत. अशा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादूर्भाव झालेल्या पक्षांची व्लिेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वाज्य संस्थेची असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बदकाचे मिश्र पालन न करण्याच्या सूचना
बदक पक्षी हे बर्ड फ्ल्यू विषाणुंचे लक्षणविरहीत वाह असल्याने कुक्कुट पक्षयांसोबत बदकांचे मिश्र पालन करण्यात येऊ नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच विविध पक्षांच्या प्रजातचिे संगोपन एकाचठिकाणी करणे जैवसुरक्षा दृष्टीने योग्य नसल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. यामध्ये कोंबडी बटेर, बदक यांचे एकत्रित पान करण्याच्या सुचना आहेत.