मेलबर्न – भारताकडून चमकदार कामगिरी केलेला व देशाला 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकून देणारा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद ऑस्ट्रेलियातील बिगबॅश लीग स्पर्धेतही यश मिळवत आहे.
भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळत नसल्याने त्याने अमेरिकेत जाऊन तेथे क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेत भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, त्याचवेळी त्याला बिगबॅश स्पर्धेचा करारही मिळाला होता.
त्याला बिगबॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून कर्णधार ऍरन फिंचच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली. त्याने सिडनी थंडर विरुद्ध 29 धावांची आक्रमक खेळी केली. यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.