सिंहगड पोलिसांकडून ‘जागतिक पोस्टमन दिना’च्या अनोख्या शुभेच्छा

पुणे – सिंहगड पोलीस ठाण्याचने जागतिक पोस्टमन दिनी एक अनोखा उपक्रम राबवला. सिंहगड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी हिंगणे पोस्ट ऑफिस येथे आपल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांच्या सह जाऊन पोस्टातील प्रत्येक अधिकारी व पोस्टमन यांना गुलाबाचे फुल आणि कॅडबरी देऊन त्यांचा सत्कार करून त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याचा बहुमान केला.

पोस्टमन यांचे प्रतिनिधी इंदुलकर यांना पोलीस स्टेशन येथे गार्डन एरियात बोलावून त्यांना मिठाईचा बॉक्‍स देऊन त्यांचा गौरव केला आहे.मिठाईचा बॉक्‍स देताना”डाकिया डाक लाया, खुशी का संदेश लाया”हे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेले डाकिया चित्रपटातील गाणे दोन वेळेस वाजवून त्यांचे मनोबल वाढवले.

या प्रसंगी देविदास घेवारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की,या पूर्वीच्या काळात दूरवर राहणारा नातेवाईक असो किंवा एखादी महत्वाची माहिती मिळविणे असो पोस्टमन शिवाय ती माहिती आपणास मिळत नसे त्या साठी प्रत्येक व्यक्ती चातका सारखी पोस्टमन ची वाट पहात असे,परंतु आजच्या व्हाट्‌स अप आणि इ मेल च्या जमान्यात पोस्टमन समाजातून दुर्लक्षित झालेला आहे.

त्यांच्या कार्याचा गौरव करावा या उद्देशाने आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन च्या वतीने आज जागतिक पोस्टमन दिवसाचे औचित्य साधून आमच्या भागातील हिंगणे पोस्ट ऑफिस मधील सर्व स्टाफचा सत्कार आणि प्रातिनिधिक स्वरूपात आज ही प्रत्येक नागरिकांचे पत्र त्याच्या घरी पोहचविण्यासाठी दिवसभर ऊन पावसाची तमा न बाळगता स्वतः सायकल वर फिरून फ्लॅट संस्कृती मध्ये पत्र पोहचवणारे इंदुलकर यांना मिठाईचा बॉक्‍स देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

जागतिक पोस्ट दिनाची आठवण ठेवून पोलीस दलाकडून पोस्ट विभागाचा अशा अनोख्या पद्धतीने झालेला सन्मान पाहून सर्व पोस्ट विभागातील अधिकारी व पोस्टमन भारावरून गेले त्यांनी या सुखद अनुभवा बद्दल पोलीस दलाचे आभार मानले तसेच या प्रसंगी पोस्टात आपल्या कामा निमित्त आलेल्या ग्राहकांनी सुद्धा पोलीस दलाने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.