पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (दि. 9) 123 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 100 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज शहरात 123 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 74 हजार 729 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4459 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 100 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 70 हजार 84 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3562 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 352 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 565 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 917 इतकी आहे.