पुणे – सिंहगड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादित होणारा ओजी-कुश प्रकारचा गांजा पकडला आहे. पकडलेल्या 1 किलो 100 ग्रॅम गांजाची किंमत 3 लाख 53 हजार इतकी आहे. अक्षय प्रकाश शेलार (25,रा.बावधान) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तपास पथकातील अधिकारी गस्त घालत असताना, पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुल्ला व धनाजी धोत्रे यांना खबर मिळाली की, दी स्मोक शॉप समोरील सार्वजनीक रस्त्यावर एक व्यक्ती काळ्या रंगाची बॅग घेऊन अंमली पदार्थ विक्रीसाठी आला आहे. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
यावेळी त्याच्या अंगझडतीत सॅकमध्ये 72 ग्रॅम ओजी कुश प्रकारचा गांजा व इतर 1 किलो 100 ग्रॅम गांजा असे 3 लाख 53 हजार रुपयांचे अंमली पदार्थ मिळून आले. ओजी कुश हा गांजा अफगाणिस्तान, कॅनडा व अमेरिकेत उत्पादीत होतो. यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का ? याचा तपास केला जात आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, अविनाश शिंदे तसेच अंमलदार धनाजी धोत्रे, पुरुषोत्तम गुल्ला, दयानंद तेलंगे पाटील, मोहन भुरुक, राजेश गोसावी, आबा उत्तेकर, सचिन माळवे, शंकर कुंभार, उज्जवल मोकाशी, निलेश कुलथे, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, रफिक नदाल यांच्या पथकाने केली.