केंद्रीयमंत्र्यांना ‘तो’ शॉर्टकट पडला महागात; वाचला असता पत्नीचा जीव

अंकोला : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या पत्नीचा आणि स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातासाठी एक शॉर्ट घेण्याचा निर्णय कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारमध्ये श्रीपाद नाईक आणि त्याच्या पत्नीसह आणखी चार व्यक्ती होत्या. अपघातानंतर जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तर पत्नी विजया नाईक यांचे रुग्णालयात निधन झाले.

केंद्रीयमंत्री नाईक यांनी सोबतच्या लोकांसह येळ्लापूर येथे सकाळी गंटे गणपतीची पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजन गोकर्णकडे रवाना झाले. मात्र राष्ट्रीय महामार्गावरून नाईक यांनी छोट्या रस्त्यावरून शॉर्टकट घेण्याचा निर्णय घेतला. या शॉर्टकटमुळे 40 किमी अंतर कमी होणार होते. पण नेमका हा शॉर्टकटच नाईक यांच्या पत्नी आणि स्वीय सहाय्यकांसाठी जीनवघेणा ठरला.

नाईक यांनी निवडलेला मार्ग खराब होता. त्याचवेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. अपघातात गाडी पलटली. गाडीत सहाजण प्रवास करत होते. त्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नाईक यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.