नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर देशाच्या लष्करी सिद्धतेचा आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसीय दौऱ्यासाठी लडाखला पोहचले आहेत. या दरम्यान ते लडाख व जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्याबरोबर संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे देखील आहेत. आज हे सर्वजण लडाखचा दौरा करणार असून उद्या जम्मू-काश्मीरला असणार आहेत.
Defence Minister Rajnath Singh, Chief of Defence Staff General Bipin Rawat and Army Chief General MM Naravane arrive at Leh Airport. Defence Minister is on a two-day visit to Ladakh and Jammu & Kashmir. pic.twitter.com/CXj2Pmoyu4
— ANI (@ANI) July 17, 2020
संरक्षणमंत्री लडाख सेक्टरमध्ये ‘एलएसी’ व काश्मीरमध्ये ‘एलओसी’वरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी त्यांचे लेह विमानतळावर आगमन झाले.या दौऱ्यावर निघण्या अगोदर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व त्या ठिकणी तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधण्यासाठी जात आहे. या अगोदर जुलै महिन्याच्या सुरुवातीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेह दौऱ्यासाठी रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी पंतप्रधान मोदी लेह जिल्ह्यातील नीमू येथे पोहचले होते. भारत व चीनच्या सैनिकांमध्ये ५ मे रोजी उफाळलेल्या संघर्षानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.