नगर -करोना महामारीची पार्श्वभूमीवर व साथीचे आजारांना प्रतिबंध करण्यासाठी निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच गावाच्या सार्वजनिक ठिकाणी औषधांची फवारणी करण्यात आली.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जालिंदर आतकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सोमनाथ आतकर, नवनाथ गायकवाड, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, विकास निकम, रंगनाथ शिंदे, बाबासाहेब काळे आदी उपस्थित होते.