जनऔषधी केंद्रांची संख्या वाढविणार – सदानंद गौडा

नवी दिल्ली – सध्या देशात स्वस्त औषधांचा पुरवठा करणारी 5322 जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत. सरकार अशी केंद्र वाढावी यासाठी प्रयत्नशील आहे, असे केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले.

ते म्हणाले की, उत्तर पूर्व आणि नक्षल भागात अशी केंद्रे उभारण्यात येत आहेत.अशी केंद्र मागासवर्गीय व्यक्‍तींना चालविण्यासाठी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेनेरिक औषधी उपलब्ध व्हावी याकरिता एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.