मायावतींकडून बसपाच्या पुर्नबांधणीस सुरुवात; भाऊ व पुतण्याची ‘महत्वाच्या’ पदांवर नियुक्ती

बसपा लोकसभा नेतेपदी दानिश अली

राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आनंद कुमार, तर राष्ट्रीय समन्वयकपदी पुतण्या

लखनौ – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षाला लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अपयशानंतर पक्षाची पुर्नबांधणी करण्याचा ध्यास घेतला आहे. पक्षाची पुर्नबांधणी करण्याच्या उद्देशानेच आज उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये बसपाची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मायावती यांनी पक्षातील प्रमुख फेरबदल घोषित केले आहेत.

या बैठकीमध्ये पक्षातर्फे दानिश अली यांना लोकसभेतील बसपाचे नेते म्हणून घोषित करण्यात आले असून मायावती यांचे भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांना देखील पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात आली असून त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदी वर्णी लागली आहे.

दरम्यान, इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मायावती यांनीच आता आपल्या कुटुंबातील व्यक्तींना महत्वाची पदं बहाल केल्याने विरोधकांद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.