Mamata Banerjee On Uniform Civil Code – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले की, त्या राज्यात नागरिकता संशोधन विधेयक (सीएए) आणि युनिफाॅर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी संहिता (युसीसी) आणि लागू होऊ देणार नाही. ईदनिमित्त कोलकाता येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘निवडणुकीत काही लोक दंगल घडवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांच्या फंदात पडू नका.’
सर्व धर्मांमध्ये एकोपा हवा-
ममता बॅनर्जी म्हणाल्या की ही आनंदाची ईद आहे, शक्ती देणारी ईद आहे. आज आम्ही देशासाठी रक्त सांडायला तयार आहोत, पण अत्याचार सहन करणार नाही. समान नागरी संहिता खपवून घेतली जाणार नाही. मला सर्व धर्मांमध्ये एकोपा हवा आहे. जर कोणी दंगल भडकावायला येत असेल तर तुम्ही शांत राहा कारण जर काही स्फोट झाला तर ते राष्ट्रीय तपास यंत्रणेला पाठवतील आणि सर्वांना अटक करतील. सर्वांना अटक केल्यास देश उजाड होईल. सर्वांनी एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे.