सुरत : गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असून देशात मंडळामध्ये गणरायाचे आगमन सुरू झाले आहे. दरम्यान, गुजरातमध्ये गणरायाच्या आगमनावेळी एक दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे गणपती मुर्ती आणतेवेळी विचेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला आहे.
आदर्श मार्केटमध्ये बुधवारी गणपतीची भव्य फूट मूर्ती आणत असताना दुर्दैवी घटना घडली. विजेच्या तारेत गणपतीची मान अडकली होती. ती काढण्यासाठी गेलेल्या दहा जणांना शॉक लागला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पावसाचे वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात अमित आणि कुणा या दोघांचा मृत्यू झाला आहे.