नोकरीच्या आमिषाने तरुणीची फसवणूक
पुणे – नामांकित कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने उच्चशिक्षित तरुणीची 33 हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत 25 वर्षीय तरुणीने तक्रार दिली. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फेब्रुवारी 2020 मध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार तरुणीला एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.
आरोपी त्या कंपनीत एचआर विभागात नोकरीला असल्याचे तरुणीला सांगितले. नोकरी लावण्यासाठी तरुणीला काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले.
तरुणीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे खात्यावर 33 हजार 340 पाठविले. पण, तरुणीला त्यांनी नोकरी लावली नाही.