नीरा -गुटखा व मावा विक्री केल्याप्रकरणी नीरेतील काका पुतण्याला अटक केली आहे. सुमारे 17 हजार चारशे रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जेजुरी नीरा पोलिसांनी धडक कारवाई करीत नीरा परिसरातील मावा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ईश्वर पवार (वय 50) व विक्रम पवार (वय 30), असे अटक करण्यात आलेल्या काका- पुतण्याची नावे आहे.
समर्थ पान शॉप येथील ईश्वर व विक्रम पवार हे गुटखा किंवा पानमसाला बनवून विक्री करीत होते. यात सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी, गुटखा असा एकूण 17 हजार 446 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे विभागीय अन्नसुरक्षा व औषध प्रशासन सह आयुक्त शुभांगी बाळकृष्ण अंकुश यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ही कारवाई जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाल्ी फौजदार विजय वाघमारे हवालदार गोविंद भोसले, सुदर्शन होळकर, संदीप कारंडे, राजेंद्र भापकर, गजेंद्र बिरुंगले, निलेश जाधव यांनी सहभाग घेतला.