मुंबई – टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजेच, ‘कौन बनेगा करोडपती’चा 13 वा सीजन सध्या महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला स्क्रीनवर पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद होत आहे.
तर दुसरीकडे सध्या अमिताभ यांना असह्य वेदना होत आहेत. पण तरीही बिग बी केबीसीचे शूटींग करत आहेत. होय, अभिताभ यांच्या तळपायाचं बोट फ्रॅक्चर झालं आहे आणि वेदनांनी ते विव्हळत आहेत. स्वतः हा अमिताभ यांनी ही माहिती शेअर केली आहे. एका ब्लॉगमध्ये त्यांनी या बद्दल माहिती दिली आहे.
ब्लॉगमध्ये बिग बींनी सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. “तळपायाच्या बोटाला फ्रॅक्चर आहे आणि मी असह्य वेदना सहन करतोय. फ्रॅक्चरच्या ठिकाणी प्लास्टर केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे ‘बडी टॅपिंग’ केलं आहे. बोट लपवण्यासाठी कॅमोफ्लॉज जोडे घातले आहेत. मोज्यासारखे आहेत पण आहेत जोडेच. माझ्या तुटलेल्या बोटासाठी सॉफ्ट प्रोटेक्शन..” असं बिग बी आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात.