अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पिंपरी दि – गेल्या तीन दिवसांपासून अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याचा महापालिकेने धडाका लावला आहे. सुरुवातीला केवळ घोषणा करुन प्रशासन थंड झाले होते. परंतु दैनिक “प्रभात’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून रोज पालिकेच्या कारवाईचा हातोडा अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त करत आहे. शुक्रवारी बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चऱ्होली येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

चऱ्होली येथील आरसीसी बांधकामे, वीट बांधकामे अशा एकूण 10 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामे पाडली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये ही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.

महापाconstruciton लिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार व सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण पथक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, 15 पुरुष पोलीस, 15 महिला पोलीस, दोन महापालिका कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई केली. यासाठी 7 पोकलेन, 2 ब्रेकर, 3 डंपर व तांत्रिक कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.