Umpires For World Cup Semifinal 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 चे लीग (साखळी फेरी) सामने संपले आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीत सर्व नऊ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने त्यांनी विश्वचषत स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला.
आता या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने पंचांची (Umpires) घोषणा केली आहे. रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) आणि रॉड टकर (Rod Tucker) हे या सामन्याचे मैदानी पंच असतील. तिसऱ्या पंचाची जबाबदारी जोएल विल्सन (Joel Wilson) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व साखळी सामन्यांमध्ये अव्वल स्थान मिळविले. न्यूझीलंड 5 विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये खेळवला जाईल. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी क्रमांक दोन आणि तीन संघांमध्ये लढत होईल.
Umpires for India vs New Zealand Semi-Final:
On-field umpires: Richard Illingworth & Rod Tucker.
Third umpire: Joel Wilson. pic.twitter.com/9wjbcoKjpj
— Johns. (@CricCrazyJohns) November 13, 2023
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया 7-7 विजयांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
टीम इंडियाने साखळी फेरीत सर्व नऊ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने त्यांनी विश्वचषत स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला.